समलैंगिकता हा गुन्हा नाही : निर्णयाचे स्वागत

समलैंगिकता हा गुन्हा नसल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे ‘आम आदमी पार्टी’ स्वागत करते.

२००१ पासून हा विषय कोर्ट कचेरीत अडकला होता. त्यावर विविध सरकारानी समलैंगिक समूहविरोधी भूमिका घेतल्याने अनेक वर्षे समलैंगिकता गुन्हा ठरत असल्याने, विविध अन्यायाला त्यांना सामोरे जावे लागत होते. आम आदमी पार्टी ने नेहमीच विविध लैंगिक कल असणाऱ्या समुहाच्या मागण्याना पाठिम्बा दिला आहे. आपल्या जाहिरनाम्यात कलम 377 रदद् करण्याचे आश्वासन दिले होते.

आता LGBT समुहाच्या लग्न ,मूल तसेच इतर कल्याणकारी आणि कायदेशीर मागण्या पुढे जाऊ शकतील. खाजगी पणा चा अधिकार हा जगण्याच्या अधिकारा चाच भाग असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे, ही बाब या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

यासाठी लढनार्या सर्वांचे अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *