शेतकरी संघटनेच्या सभासदांना मार्गदर्शन

कारंजा लाड शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी संघटनेच्या सभासदांना मार्गदर्शन करताना.

आज कारंजा लाड, तालुका वाशीम येथे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी कामावर असताना शाहिद झालेले BSF चे जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या पश्चात त्यांना 3 लहान मुले, पत्नी व म्हातारे आई वडील आहेत. शाहिद जवान सुनील ढोपे यांच्या पाश्चात त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळावी यासाठी योग्य तो सर्वोतोपरी मदत करायचे आश्वासन दिले

वाशीम जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या आहेत. आता देखील कमी पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

जर 8 लाख करोड चे कर्ज देशातल्या मोठया उद्योगपतींना दिले जाते, सर्व विशेष सवलती श्रीमंत उद्योगपतींना दिली जाते पण ज्यामुळे आपल्या घरात अन्न मिळते, तो बळीराजा गरीब शेतकरी याना शेतीसाठी सर्वोतोपरी मदत मिळावी यासाठी सरकार दरबारी मोठे आंदोलन महाराष्टात छेडण्याचे आव्हाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *