राम कदम यांची गंभीर विधाने, निषेध!

भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. ‘एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,’ असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले. त्यावेळचे वातावरण हलके-फुलके होते तेव्हा आपण असे विधान केले असून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असे अत्यंत उर्मट स्पष्टीकरण भाजपा आमदार राम कदम यांनी दिले आहे .

एकतर्फी प्रेम आणि त्यातून मुलीवर असिड फेकण्याच्या, प्राणघातक हल्ल्याच्या गंभीर घटना मुंबई , पुणे सह सर्वच महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही विधाने गुन्हेगारीला प्रवृत्त करणारी आहेत याचेही भान राम कदम यांना नाही असे दिसते.

*हलक्या फुलक्या वातावरणात नितीमत्ता सोडून वागावे,असे राम कदम यांना म्हणायचे आहे का? अशीच, ‘देठ हिरवा ‘ असल्याची विधाने मुलांसमोर गिरीश बापट यांनी केली होती आणि त्याचे समर्थन असेच हलक्या फुलक्या वातावरणात बोलून गेलो, असे केले होते. इतर वेळी संस्कृती आणि नीतिमत्तेचे ढोल वाजवणाऱ्या भाजपा आमदारांच्या मनातील मनुवादी विचार, ‘स्त्रीला स्वतःची खाजगी मालमत्ता समजणारा पुरुष’ हा असा सतत अनेक घटनांत डोकावताना दिसतो आहे.*

आम आदमी पार्टी याचा तीव्र निषेध करत असून महिला आयोगाने स्वतःहून याची दखल घेत, राम कदम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *