माहूल प्रकल्पग्रस्तांची विराट जाहीर सभा.

IIT Mumbai चा प्रदूषण विरोधात अहवाल तसेच न्यायालयाने सरकरला दिलेले आदेशानुसार ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात विभागवार आमदारांच्या भेटीत सगळ्याच आमदारांनी माहूल प्रकल्पग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच पद्धतीने या कामाचा पाठपुरावा देखील समिती सातत्याने करीत आहे. याच बरोबर माहुल म्हाडा वसाहतीतील राहिवाश्यांच्या आरोग्य विषयक गंभीर समस्या समोर येत आहेत याच पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक १४/१०/१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता माहूल प्रकल्पग्रस्त यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत आम आदमी पक्षाचे राज्याचे नेते धनंजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले आणि मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांबरोबर राहून लढ्यात सहभाग नोंदविला

माहूल: मानवी कचरापेटी

तानसा पाईपलाईन प्रकल्प ग्रस्त जवळजवळ ३०,००० नागरिकांचे पूनर्वसन माहूल येथे करन्यात आलेले आहे. तानसा पाईपलाईन येथील हे रहीवासी आपल्या रोजच्या आयूष्यातील गरजा पूर्ण करण्यास मदत करत असतात, म्हणजेच हे आपल्याला भाजी पूरविने, घरकाम करने किंवा इतरही अनेक कामांत सतत उपयोगी पडत असतात, एवढेच नव्हे तर त्यापैकी अनेकजण वकील, इंजीनियर, चार्टड अकाउंटन्ट अशा मोठ्या हूद्दयांवर काम करनारी उच्च शिक्षित मंडळी सूद्धा या परिसरात राहातात. मात्र सरकारला या आयूष्यांची काहीही किंमत वाटत नाही, असे या संगळ्यांना माहूल सारख्या अतिप्रदूषित ठीकाणी पूनर्वसित करून सरकारने दाखवून दिले आहे. माहूल य़ेथे प्रदूषणाचा स्तर अति जास्त असल्याने हे ठीकाण मानवी रहीवासास योग्य नाही, येथे राहणा-यांना वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांना बळी पडावे लागत आहे. असे असून सूद्धा सरकार माहूलवासियांच्या मागण्यांचा गंभीर विचार करताना दिसत नाही.

पूनर्वसितांचे जीव धोक्यात
मृत्यू: सरकारने माहूल परिसरात पूनर्वसन सूरू केल्या पासून या परिसरात आतापर्यंत ११० लोक मृत्यूमूखी पडले आहेत.
आजार: माहूल परिसरात राहण-या प्रत्येक कुटूंबातील एक ना एक सदस्य प्रदूषणामूळे होणा-या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून येते. टीबी, अस्थमा, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, हृदय विकार, रक्तज्वर, कर्करोग यासारखे जीवघेणे आजार येथील रहीवास्यांना होत आहेत.
बीपीसीएल मधील स्फोट: बीपीसीएल आँईल रिफयनरी मध्ये झालेल्या अपघाता नंतर सरकारकडून किंवा अपघात नियंत्रण विभागाकडून कोणीही पूनर्वसितांना भेटायला आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला असल्यास मदतीचे आश्वासन देखील देण्यास कूणीही फिरकले नाही. अशाप्रकारचा अपघात पून्हा होण्याची शक्यता असल्याने येथील नागरिक सतत भीतीच्या वातावरणात आहेत.
प्रदूषण: कर्करेगासारख्या आजारास कारणीभूत ठरणा-या बेनझिन या प्रदूषकाचे प्रमाण माहूलमध्ये सामान्य पेक्षा ४८६० टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले आहे. या परिसरात तीन मोठ्या आँईल रिफायनरीज आहेत, ज्यामध्ये २०० पेट्रोलियम टँक आहेत, या टँकची क्षमता २००० मीलीयन लिटर एवढी आहे. तसेच या परिसरात गँस प्लान्ट आहेत जे संपूर्ण महाराष्ट्राला कूलींग गँसचा पूरवठा करतात. माहूलमध्ये ७ ये ८ केमीकल फँक्टरीज आहेत.
राष्ट्रीय हरित अधिकरण: राष्ट्रीय हरित अधिकरणाने सरकारला वेळोवेळी माहूलयेथील प्रदूषणाविषयी सूचना दिल्या आहेत. प्रदूषण, आरोग्य किंवा बफर झोन यापैकी कोणत्याही सूचनाकडे सरकारने लक्ष दिले नाही.
मूलभूत सुविधाची कमतरता
वैद्यकीय सुविधा: माहूल मधील रहीवास्यांना रूग्णवाहीका, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा प्रसूति केंद्र याप्रकारच्या कोणत्याही मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. सर्वात जवळचे आरोग्य केंद्र ६ कीमी अंतरावर आहेत.
शैक्षणिक सुविधा: शैक्षणिक वर्षाच्या मध्येच माहूलमध्ये स्थलांतर केल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. ब-याच काळापर्यंत शाळेची सुविधा येथे नव्हती. आता असणारी सुविधा ही विद्यार्थ्यांच्या संख्येसमोर अपूरी असून विद्यार्थी पूर्वी जात असलेल्या शाळेतच आताही जाणे पसंत करतात. मात्र या शाळा १० ते १५ कीमी दूर असल्याने येण्याजाण्यातच पूर्ण दिवस खर्च होतो.
वाहतूक: माहूल येथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन हे चेंबूर व कूर्ला हे असून ते देखील १० कीमी लांब आहे. बसची सुविधा देखील अनियमीत आहे.
आजीविका: पूनर्वसित नागरीक आजीविकेसाठी त्यांचा जून्या ठीकाणावर अवलंबून होते. स्थंलातरनामूळे त्यांच्या आजीविकेवर परिणाम झाला आहे. माहूल परिसरात रोजगाराचे पर्याय उपलब्ध नाहीत.

अपयशी पूनर्वसन
मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित अधिकरणाच्या सूचना लक्षात घेत असे नमूद केले आहे की, सरकार नागरीकांचे पूनर्वसन करण्यास अपयशी ठरले आहे. सरकारने माहूल मधील पूनर्वसितांचे स्थानांतर करण्यात यावे असे निर्देष न्यायालयाने दिले.

माहूल प्रकल्प ग्रस्तांचे पूनर्वसन अभियानात आम्हाला सहकार्या ही विनंती
या पँम्पफ्लेटचा फोटो मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून आम्हाला सहकार्य करा..
ट्वीटर हँडल: @Dev_Fadnavis
#NoToMahul

घर बचाओ घर बनाओ आंदोलन । माहूल प्रकल्पगर्स्त समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *