पुणे आम आदमी रिक्शा संघटना – यशस्वी उपोषण

आम आदमी म्हणून जन्माला आलेल्या नागरिकांनी किड्या मुंग्यासारखं जगावं आणि मरावं, असंच आजकाल पहावयास मिळतं. ५ ऑक्टोबर, २०१८ मंगळवार पेठ पुणे येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व जखमी व्यक्तींना “कायद्याप्रमाणे” योग्य मदत मिळावी, पीडित कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे खात्यात रुजू करून घ्यावे व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागण्या घेऊन आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे कार्यकर्ते कलेक्टर अॉफिस येथे बेमुदत उपोषणाला बसले.

नेहमीप्रमाणे हे आंदोलनसुद्धा संपून जाईल, या अविर्भावात प्रशासन होते. मात्र आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्यानंतर अखेर प्रशासन झुकलं. उपोषणाच्या पाचव्या दिवशी पुण्याचे खासदार श्री. अनिल शिरोळे, पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांच्यामुळे 16 ता.डि.आर.एम.पुणे आणि येणार्या आठवड्यात मा.जिल्हाधिकारी मिटिंग घेणार असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.मिटिंगमधे पिढित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम आदमी रिक्षा संघटना. खासदार आणि पालकमंत्र्यांच्या घरासमोसमोर आंदोलन करणार असल्याचा लेखी पत्राद्वारे इशारा देण्यात आला.

१)रेल्वे अधिकाऱ्यांनी पिढीत कुटूंबातील व्यक्तींना कामात सामील करून घेण्यासाठी मा.पालकमंत्री गिरीषजी बापट,मा.खासदार अनिलजी शिरोळे,डि.आर.एम.रेल्वे पुणे प्रयत्नशिल आहेत.तसा प्रस्ताव ते दिल्ली उच्च अधिकारी आणि रेल्वेमंत्री यांच्या कडे पाठविणार आहेत.
२)सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
३) ५ लाख व १ लाख रक्कम तातपुर्त्या स्वरुपात आहे भविष्य कायद्याच्या नियमानुसार आणखी देण्यात येईल.

एक आम आदमी जागा झाल्यानंतर काय होऊ शकतं हे या आंदोलनाने सिद्ध केलंय.

उपोषणकर्ते बाबूजी (वय वर्ष ७०), अर्षद अन्सारी, गणेश ढमाले व बाबा सय्यद यांच्या जिद्दीला सलाम..
मा.श्री.आचार्य सल्लागार यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाने आणि शिवनेरी रिक्षा संघटना,पुणे शहर फुड असोशिएशन,महाराष्ट्र बहुजन सेना,भाजपा वाहतुक संघटना,नवि मुंबई रिक्षा महासंघ,राष्ट्रिय परिवर्तन संघटना,राष्ट्र सेवा दल,टायगर ॲटो रिक्षा संघटना नांदेड तसेच सर्व रिक्षाचालक संघटनेचे दोन वाघ आनंद अंकुश आणि केदार ढमाले-जिब्रिल शेख,एकनाथ सव्हाणे,अहमद शेख,फरहान शेख,असगर बेग,जाफर कादरी,विकास अंकुश,किशोर मुजुमदार,सुभाष करांडे
पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम आदमी पक्ष, आम आदमी रिक्षा चालक संघटना, आप युवा आघाडी प्रयत्नशील नक्कीच असेल.

#आतामरायचंनाही_लढायचं

https://m.facebook.com/story.php?story_fbid=476839142804481&id=450748905413505

AAP Pune Meeting with DRM along with Shri. Anil Shirole.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=476838372804558&id=450748905413505

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *