धार्मिक स्थळांवर अतिक्रमणही करू देणार नाही

शांतीप्रिय, अहिंसावादी जैन समाज त्यांच्या ताब्यात असलेल्या शिखरजी या त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या पवित्र स्थळावर झारखंड सरकारच्या पर्यटन स्थळ विकासाच्या नावाखाली कब्जा करण्याच्या घटनाविरोधी प्रयत्नाला जैन समाज भारतभर विरोध करत आहे.

झारखंड सरकारने जैन समाजावर अन्याय करू नये उलट शिखरजी या जैनांच्या धार्मिक स्थळाला भारताची धार्मिक धरोहर घोषित करून तिथे पर्यटन स्थळ किंवा इतर काहीही न करण्याच्या मागणीला आम आदमी पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे अशा बाबतीत जैन समाजच काय इतर कोणत्याही धर्माच्या पाठीशी आम आदमी पक्ष खंबीरपणे उभा आहे. वेळ पडल्यास पंतप्रधानांनी लक्ष घालून या समस्येचे निराकरण करावे अशी आम आदमी पक्षाची विनंती आहे. आम आदमी पक्ष धर्माचे राजकारण करीत नाही पण कोणाच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमणही करू देणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *